नमस्कार मंडळी,
नाट्यकला ही मराठी माणसाच्या रक्तात भिनली आहे. नाटक हे मराठीपणेचे वेड आहे, तो आपला खरा धर्म आहे, ती आपली संस्कृती आहे. जगाच्या पाठीवर कुठेही मराठी माणूस असला तरीही तो नाट्यकलेशी बांधलेला असतो - नुसता प्रेक्षक म्हणून नाही तर कलाकार म्हणून सुद्धा. विशेषतः महाराष्ट्रच्या बाहेर, उत्साही रंगकर्मींनी मराठी नाटकांची परंपरा अविरत सुरु ठेवली आहे.
मित्रांनो, महाराष्ट्रात मराठी नाटकांचा आणि कलाकारांचा गौरव दरवर्षी होतो. पण जागतिक स्तरावर हा उत्सव साजरा केला जात नाही आणि आमचा हाच मानस आहे. त्या दिशेने आम्ही आमचे पहिले पाऊल उचलतो आहे आणि सादर करीत आहोत -
नाटयालंकार सोहोळा
हा कार्येक्रम जुन ३ २०२३ रोजी ऑन लाईन पद्धतीने दिमाखदार स्वरूपात संप्पन्न झाला. ह्या कार्येक्रमात मधुरा वेलणकर-साटम, समीर चौघुले, संदीप खरे, आनंद इंगळे, सुबोध भावे, सुकन्या कुलकर्णी-मोने, पुष्कर श्रोत्री, विजय केंकरे, सुनील बर्वे आणि वंदना गुप्ते ह्या मान्यवरांनी सहभाग घेतला.
COVID नंतर (२०२१-२२) सादर झालेल्या उत्तर-अमेरिकेतील नाटक आणि एकांकिका ह्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत.
अधिक माहिती इथे